Latest Marathi News | ट्रक लुटणाऱ्यास 4 तासात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parola: Police inspector Ramdas Wakode, investigating officer Shekhar Domale and police personnel along with the arrested suspect

Jalgaon News : ट्रक लुटणाऱ्यास 4 तासात अटक

पारोळा : येथे महामार्गावर ट्रकचालकाला थांबवून पोलिस असल्याची बतावणी करून पिस्तूल दाखवून मोबाईल व पैसे हिसकावून पळ काढणाऱ्या संशयितास अवघ्या चार तासांत पारोळा पोलिसांनी गजाआड केली आहे.

ट्रकचालक देवाशिस शामदत्त (वय ४४, रा. कालघात, जि. परगणा, पश्चिम बंगाल) हे त्यांचा सहचालकासह १४ चाकी ट्रक घेऊन (डबल्यूबी २५, एल २९९९) ने लोखंडी बार ओरिसा येथून गुजरात येथे जात असताना एरंडोल ते पारोळा दरम्यान महामार्गावर म्हसवे गावाच्या हद्दीत दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडील दुचाकी ट्रकच्या समोर रोडवर लावून ट्रक थांबवून पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील पिस्तूलसारखे टोकदार शस्त्र दाखवून शामदत्त यांच्या खिशातून मोबाईल व रोख सातशे रुपये काढून घेत पळ काढला. (Truck robbery arrested in 4 hours Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Accident News : मुलीची भेट स्मरणी ठेवत पित्याचा अपघाती मृत्यू

दरम्यान, शामदत्त यांनी दुपारी एकला पोलिस ठाणे गाठून हकिगत सांगितली असता पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ तपासचक्र फिरून सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड, पोलिस कर्मचारी संदीप सातपुते, किशोर पाटील, अभिजित पाटील, राहुल पाटील, राहुल कोळी, हेमचंद्र साबे, आशिष गायकवाड, अनिल वाघ यांच्या पथकाने अवघ्या चार तासात संशयित शाहरुख अब्बास खाटीक (वय २६, रा धुळे) यास अटक केली.

संशयिताकडून फिर्यादीचा मोबाईल व पाकीट त्यात आधारकार्ड व रोख सातशे रुपये व एक छर्राची पिस्तूल हस्तगत केले आहे. तसेच दुसऱ्या संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून, त्यास पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल असून संशयितास पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेखर डोमाळे तपास करीत आहे.

हेही वाचा: Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..