जळगाव : तलाठ्याला धमकावत पळवला डंपर; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन वाहतूक काही केल्या बंद होत नसून महसूल अधिकाऱ्यांना न जुमानता वेळप्रसंगी धमकावून धक्काबुक्की करून कारवाईतील वाहने पळवली जात आहे. तालुका पोलिसांत तलाठ्याला धमकावत डंपर पळवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरणा नदीपात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने गस्तीपथकाची नियुक्ती केली आहे. शनिवारी (ता. १२) तलाठी राजू कडू बाऱ्हे (वय ४९) यांनी गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारा डंप‍र (एमएच १९ सीवाय ४४१४) तपासणीसाठी अडवला. त्यातून अवैधरीत्या वाळू चोरून वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी डंपर ताब्यात घेत जिल्‍हाधिकारी कार्यालयात नेण्यात येत असताना डंपरचालक सागर नावाच्या व्यक्तीने मालक आनंद इंगळेला फोन करून बोलावून घेतले. दोघांनी तलाठी बाऱ्हे यांना धक्काबुक्की करत डंपर पळवून नेला आहे. बाऱ्हे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करत आहेत.

Crime News
जळगाव : कर्जबाजारी तरुणाने घेतला गळफास

वाळू उपसा सुरूचं

जिल्ह्यात वाळू उत्खननाबाबत एक दोन ठेके वगळता कुठल्याच ठेक्यांना परवानगी नसताना बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. नदीपात्रात या वाळू चोरट्यांनी मोठमोठ्या खदानी तयार केल्या असून नदीत पाणी आल्यावर या खदानी निरपराधांचे जीव घेतात. गेल्या चार दिवसांपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी (ता. १३) एकाच दिवसात एक गुराखी व एका तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू ओढवला आहे.

Crime News
फडणवीसांना डेटा काढून देणारा तेजस मोरे आहे कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com