Jalgaon News : धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी प्रौढाचा मृत्यू | Unidentified adult dies after falling from train jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Jalgaon News : धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी प्रौढाचा मृत्यू

Jalgaon News : माहेजी (ता. जळगाव) रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.२०) दुपारी घडली. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


जळगाव ते माहिजी या मध्यरेल्वेच्या रुळावरील माहेजी रेल्वे स्थानक जवळ (खंबा क्रमांक ३८५/१३) धावत्या एक्स्प्रेस रेल्वेतून पडल्याने अनोळखी प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती जळगाव लोहमार्ग पोलिसांना कळविल्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यात मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही.

याबाबत जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस नाईक हिरालाल चौधरी तपास करीत आहेत.