Latest Marathi News | जळगाव : कुसुंब्यात अज्ञाताने अल्पवयीन बालिकेला पळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latest Marathi News

जळगाव : कुसुंब्यात अज्ञाताने अल्पवयीन बालिकेला पळवले

जळगाव : कुसुबा (ता. जळगाव) येथील १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: अबब! कलेक्टर बंगल्या समोरच वाहनावर हल्ला; मद्यधुंद दारुड्यांचा धिंगाणा

कुसुंबा गावात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी(ता. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करून फूस लावून पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत मुलगी ही घरी न आल्याने तिच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही आढळून आली नाही. अखेर मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

हेही वाचा: पोलिस विभागात चहापेक्षा किटली गरमचा अनुभव; हजेरीमास्तरची कर्मचाऱ्याला दमबाजी

Web Title: Unknown Person Abducted The Minor Girl In Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..