Unseasonal Rain : वादळी पावसाचा फटका; चोपडा तालुक्यात 485 हेक्टरवर पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain Crop loss on 485 hectares in Chopda taluka jalgaon news

Unseasonal Rain : वादळी पावसाचा फटका; चोपडा तालुक्यात 485 हेक्टरवर पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा, भुसावळ, तसेच अमळनेर तालुक्यातील काही भागात बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. (unseasonal rain Crop loss on 485 hectares in Chopda taluka jalgaon news)

या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चोपडा तालुक्यात १९ गावांत झाले आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

चोपडा तालुक्यात बुधवारी (ता. १५) झालेल्या अवकाळी पावसामुळे १९ गावांमधील ४८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या मालास भाव नाही. त्यात पुन्हा तालुक्यात झालेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

तालुक्यातील १९ गावांमधील ५१३ शेतकऱ्यांच्या ४८५ एकर क्षेत्रावर नुकसान झालेले आहे. यात मका ११७ हेक्टर, गहू ९७ हेक्टर, ज्वारी १३९ हेक्टर, हरभरा १०७ हेक्टर, केळी २५ हेक्टर असे एकूण ४८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पाचोरा परिसरात पावसाची हजेरी

पाचोरा : येथील तालुका व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण व हलके वादळ असून बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. पावसाच्या हजेरीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व्यापाऱ्यांना इतरत्र हलवावे लागले.

काही धान्य ओले होऊन नुकसान झाले आहे. तसेच गहू काढणी सुरू असल्याने पावसामुळे गव्हाचे नुकसान झाले आहे. हरभऱ्यालाही पावसाची झळ पोहोचली आहे. या वातावरणामुळे सर्दी, अंगदुखी, ताप, खोकला या आजाराच्या रुग्णात प्रचंड वाढ झाली असल्याने नागरिकांमधील भीती वाढली आहे.

तापी पट्ट्यात तुरळक पाऊस

भुसावळ शहरासह तालुक्यात कमी, अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहेत. दरम्यान, बोदवड यथे रात्री दोन तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज सकाळी देखील तुरळक पाऊस झाला. फैजपूर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. तर रावेरला रात्री तुरळक पाऊस होता. मात्र नुकसान नाही. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

टॅग्स :Jalgaonrain damage crops