Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह पाऊस लोहारा परिसरात गारपीट; पिकांचे अतोनात नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to crops due to hailstorm in the area on Friday.

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह पाऊस लोहारा परिसरात गारपीट; पिकांचे अतोनात नुकसान

लोहारा (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या कळमसरा येथे शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी चारच्या सुमारास विजेचा कडकडाट व जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली.

या गारपिटीने रब्बी पिकांचे (Rabbi) मोठे नुकसान झाले आहे. (unseasonal rain with lightning and strong gale and hail places lohara jalgaon news)

कळमसरा येथील शेतकरी संजय शांताराम उशीर (गट क्रमांक ४३) यांच्या शेतात झालेल्या गारपिटीने सोलर पॅनेलला अक्षरशः छिद्रे पडले. परिसरात उभे असलेले गहू, ज्वारी, दादर, सूर्यफूल, मका, हरभरा, पालेभाज्या ही पिके जमीनदोस्त झाली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मार्चमध्ये सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. आधीच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, त्यात काढणीला आलेली सर्व पिके हातातून निघून जात आहेत. या मुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.