Jalgaon Unseasonal Rain : ‘झटका मशीन’ने तारले अन् ‘अवकाळी’ने मारले! | Unseasonal rains in Jalgaon Tondapur avoids damage from wild animals storm destroys crops news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal Rain crop damage farmer

Jalgaon Unseasonal Rain : ‘झटका मशीन’ने तारले अन् ‘अवकाळी’ने मारले!

Jalgaon Unseasonal Rain : परिसरात केळी, मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या पिकांचे वन्यप्राण्यांकडून संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वीजतारांमध्ये करंट असलेले झटका मशिन बसविले आहे.

याद्वारे पिकांचे नुकसान टळले असले तरी अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांना मारले असल्याची अवस्था झाली आहे. (Unseasonal rains in Jalgaon Tondapur avoids damage from wild animals storm destroys crops news)

तोंडापूर परिसराला लागून अजिंठा डोंगररांग असल्याने उन्हाळ्यात वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात शेतातील मालाचे नुकसान करतात. या परिसरातील तोंडापूर, कुंभारी बुद्रुक, ढालगाव, मांडवा,

भारुडखेडा येथील शेतकरी केळी, मका, गहू, कांदा पिकांची रब्बीच्या हंगामात लागवड करत असल्याने पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन आलेल्या तंत्रज्ञान झटका मशीनचा वापर करून शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी या वर्षी मोठ्या प्रमाणात झटका मशिनचा वापर करून वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून वाचविले.

मात्र तोंडापूर परिसरात सतत पाच दिवस अवकाळी वादळी वाऱ्यासह गाराच्या माऱ्याने व जोरदार हवेने घराचे, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तोंडापूर येथे वन्यप्राण्यांकडून नियमित होणारे नुकसान टाळण्यासाठी झटका मशिन मोठ्या प्रमाणात मोठ्या शेतकऱ्यांनी खरेदी करून शेतात बसविले होते.

चार्जिंगवर चालणाऱ्या या झटका मशिनला परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. तोंडापूरसह परिसरात अजिंठा लेणी डोंगररांगांमधील वन्यप्राणी, नीलगाय, हरीण, रानडुक्कर, अस्वल, वानर याच्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने ते झटका मशिनच्या झटक्याने वाचत असल्याने यावर्षी ‘झटका मशिन’ने तारले मात्र अवकाळीने मारल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.