New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणासाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे.. | Vice Chancellor guidance in Umvi about employees be ready for new educational policy jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Education Policy

New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणासाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे..

Jalgaon News : कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी यांनी केले. (Vice Chancellor guidance in Umvi about employees be ready for new educational policy jalgaon news)

यासंदर्भात विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे टप्पे व संपूर्ण आराखडा, शासनाचे परिपत्रक यासंदर्भातील माहिती कुलगुरूंनी सादर केली.

असे राहील स्वरूप

नव्या धोरणात पहिल्यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल. प्रत्येक विषयाचे क्रेडिट निश्चित केले जाईल. शिक्षण सुरू असताना, विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री आणि मल्टीपल एक्झीट काही अटींसह दिली जाईल. मात्र, त्यासाठी सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे. कुलगुरूंनी इतर माहिती देऊन आपले कुटुंब, परिसरातील विद्यार्थी, पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन यासंदर्भात करावे, असे आवाहन केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना करावी याबाबत अभ्यासपूर्ण तयारी करावी असेही सूचित केले. या वेळी कर्मचारी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. डॉ. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेस विद्यापीठातील प्रशाळा संचालक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaoneducation