जळगाव : बेशिस्त वाहतूक अन्‌ खड्ड्यांमुळे अयोध्यानगरातील तरुणाचा बळी

अवैध पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अपघात, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Victim of youth Ayodhyanagri due unruly traffic and potholes jalgaon
Victim of youth Ayodhyanagri due unruly traffic and potholes jalgaonsakal

जळगाव : घरून मेडिकलवर जात असताना दुचाकी ट्रकवर आदळून प्रवीण पवार (वय ३६, रा. अयोध्यानगर) हा तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी सातला एमआयडीसीतील हॉटेल वासुमित्रा हॉटेलजवळ घडली. ट्रकची बेशिस्त पार्किंग, ओबडधोबड रस्ते अन्‌ याकडे वाहतूक पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यातून पुन्हा एकदा एकाचा बळी गेला आहे. आतातरी याकडे वाहतूक शाखा व जिल्हा प्रशासन लक्ष देईल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पतीच्या अपघाताचा पत्नीला मानसिक धक्का बसला असून, त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रवीण यांचे सुप्रीम कॉलनीत मेडिकल आहे. शुक्रवारी सायंकाळी ते मेडिकलवर जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ मध्येच उभ्या असलेल्या बेशिस्त पार्किंग केलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. त्यात पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाइकांनी त्यांना तेथून खासगी रुग्णालयात नेले. तेथे मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या अपघाताचा रुग्णालयात पत्नीला मानसिक धक्का बसला. पतीचा मृत्यू झाल्याबाबत त्यांना कळू दिले नाही. प्रकृती बिघडल्याने त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवीण यांच्या मागे पत्नी वंदना, आई सुमित्रा, मुलगा गोलू (वय ५) व बहीण अश्विनी असा परिवार आहे.

अजून किती बळी जाणार?

अयोध्यानगर हा परिसर आधीच अत्यंत गजबजलेला आहे. या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. त्यातच या ठिकाणी रस्त्यावरच बेशिस्त पद्धतीने ट्रक लावण्यात येत असतात. प्रचंड रहदारी असल्याने साहजिकच या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आवश्यक आहे. परंतु याठिकाणी वाहतूक पोलिस दिसत नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांचे अजूनच फावत असते. त्यामुळे प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभारामुळे अजून किती बळी जाणार, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com