video बघा संपुर्ण अत्याचारा घटनाक्रम ;लहानग्यांची जासुसांनी सांगितली अखोदेखी

पेालिसांच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरलेले लहानगे
पेालिसांच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरलेले लहानगे

जळगाव ः- गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपासात सीसीटीव्ही फुटेज संकलित होऊन स्केचही उभेउभ काढण्यात आले. मात्र तरी सुद्धा संशयिताचा शोध लागत नव्हता. गुन्हेशाखेच्या पथकाने रेल्वेत भिक्षा मागणाऱ्या लहान मुलांशी संपर्क करून त्यांना पीडितावर झालेल्या अत्याचाराचे गांभीर्य सांगत संशयिताचा स्केच दाखवला. दोघांना विश्‍वासात घेतल्यावर त्यांनी संशयिताचे वर्णन तर सांगीतलेच सोबतच त्या संशयिताने पिडीत बालिकेला कुठे व कसे नेले हे देखील सांगून टाकले. 

रेल्वेस्थानकावर पिडिता कुटुंबासह भिक्षा मागते..तिला पाच रुपये देऊन तुला खाऊ देतो असे सांगत संशयित सौरभ खिर्डीकर याने सोबत नेले. मात्र, त्याच्यावरही पाळत ठेवलेल्या देान चिमुरड्यांचा पोलिसांनी शोध घेतला. प्राप्त सीसीटीव्ही..स्केच याच्या माध्यमातून संशयिताचा नेमका पत्ता शोधून त्याला दुपारी अटक करण्यात आली. पेालिसांच्या तपासात महत्त्वाचा दुवा ठरलेले लहानगे भिक्षेकरी यांना विश्‍वासात घेत पेालिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम (आखोदेखी) मांडला तो, असा. त्याने..माई(पिडीतेचे काल्पनिक नाव) ला सोबत जिन्यावरून नेले..माई त्या माणसाच्या मागे..मागे का जातेय म्हणून आम्ही पाठला गेला..तिसऱ्या मजल्यावरील उघड्या गाळ्यात नेऊन त्याने गैरकृत्य केल्याचे हुबेहूब वर्णन दहा ते  बारा वर्षीय दोघा मुलांनी पेालिसांना सांगितले. तेव्हा पासून गुन्हेशाखेच्या साध्यावेशातील पेालिस या दोघा मुलांना सोबत घेऊन संशयिताचा शोध घेत होते. अटक केल्यावर दोघांच्या समोर सौरभ सारखाच दिसणाऱ्या तरुणाला आणल्यावर काही वेळ ते, विचार करत त्यांनी नकार दिला. मात्र खरा संशयित सौरभ पकडला गेल्यावर..त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून दोघांनी दुरून त्याची ओळख पटवली आणि होय..याच्याच सेाबत माई गेल्याचे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष सांगितले.

निराधारच निराधाराच्या मदतीला 
गुन्हे शाखेसाठी स्केच काढणारे कलावंत योगेश सुतार यांनी सीसीटीव्हीचे अवलोकन करून आरोपीचे स्केच काढले होते. त्यानुसार तपास पथकाने कामाला सुरवात केली. रेल्वेस्थानक परिसर पूर्ण बंद असून, तेथील भिकारी, निराधार लोकांनी जवळपासच्या परिसरात आश्रय घेतला आहे. त्यापैकीच पीडिताही आहे, तर गुन्हेगाराची माहिती पोलिसांना देत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत करणारा लहानगा भिकारीही निराधारच आहे. त्यामुळे एका निराधारामुळे दुसऱ्या निराधाराला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, गोलाणी मार्केटच्या चारही बाजूंना आश्रयाला असलेल्या लहान मुलांना स्केच दाखवल्यानंतर त्यांनी या आरोपीची ओळख पटवली. दोघेही चिमुरड्यांनी पीडित मुलीसोबत या मुलाला जाताना पाहिले होते. 

टिळा लावणाऱ्याची चौकशी 
पीडित मुलीला खोलीत नेणाऱ्या तरुणाला दोन लहानग्यांनी बघितले असल्याने त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून एका मेडिकलवर कामाला असलेल्या तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. हा तरुण हुबेहूब स्केचसारखा चेहरा असलेला आणि शरीरबांधाही तसाच असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र, खरा संशयित सौरव खर्डीकर तोपर्यंत निर्धास्त हेाता. ताब्यात घेतलेल्या तरुणासारखाच दिसणाऱ्याचा शोध सुरू केल्यावर दुपारी एकला त्याला इंद्रप्रस्थनगर येथून राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघा लहानग्यांनी त्याला ओळखले. 

पुरावे संकलित 
घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकाने पुरावे संकलित केले असून, तपासात त्याचा वापर होणार आहे. २४ तासांत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी आपल्या पथकाचे कौतुक करून त्यांना रिवार्ड जाहीर केला. 

 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com