Jalgaon News : अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध; विनयभंग, जबरी चोरी, खंडणी अशे गंभीर गुन्हे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishal Sonawane criminal of serious crimes was expelled from district jalgaon news

Jalgaon News : अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध; विनयभंग, जबरी चोरी, खंडणी अशे गंभीर गुन्हे!

अमळनेर (जि. जळगाव) : दुचाकी चोरी, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी, धारदार शस्त्र बाळगणे आणि मारहाण अशा विविध गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार (Criminal) विशाल विजय सोनवणे (वय २७, रा. फरशी रोड, अमळनेर)यास जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून,

नागपूर सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. (Vishal Sonawane criminal of serious crimes was expelled from district jalgaon news)

विशाल सोनवणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याच्यावर एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. यात प्रामुख्याने मोटारसायकल चोरी, महिलेचा विनयभंग, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी दंगल माजवून तसेच शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत माजवणे, लोखंडी फायटर मारून, पिस्तूल कपाळाला लावून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचे ३ गुन्हे देखील दाखल आहेत.

संशयिताला हद्दपार करून देखील आदेशाचे पालन करीत नव्हता. तसेच अनेक वेळा त्याचे चांगले वर्तणुकीचे बॉण्ड घेऊन देखील त्याचे तो पालन करत नव्हता. कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यास भीती राहिलेली नव्हती. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीने त्याने लोकांची मालमत्ता व जीवित धोक्यात आणले होते. तसेच धार्मिक सदभाव देखील धोक्यात आणला होता. अमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे त्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षितपणाची भावना तयार झाली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यात अमळनेर शहरातील ३ अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

या कारवाईत पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस अंमलदार किशोर पाटील, शरद पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, अक्षदा इंगळे तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, चालक मधुकर पाटील,

सुनील पाटील, संदेश पाटील, हितेश चिंचोरे, मिलिंद भामरे या सर्वांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांची मदत व पाठपुरावा खूप मोलाचा आहे. तसेच त्यांचे सहकारी पोलिस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.