Water Supply News : जळगाव शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद | Water supply stopped in Jalgaon city on Saturday Supply will be one day late in all areas Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

Water Supply News : जळगाव शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

Jalgaon News : राज्य वीज वितरण विभागातर्फे १२ केव्ही उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी (ता. २०) वीजपुरवठा बंद राहणार आहे.त्यामुळे शनिवारी होणारा शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहरात शनिवारी ज्या भागात पाणीपुरवठा आहे, त्या भागात रविवारी (ता. २१) पाणीपुरवठा होईल, तसेच त्याच क्रमाने शहरातील सर्वच भागांतील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला जाईल.

नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Water supply stopped in Jalgaon city on Saturday Supply will be one day late in all areas Jalgaon News)

असा होईल पाणीपुरवठा

रविवारी (ता. २१) खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभुजा वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर-निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकी दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, डीएसपी बायपास तांबापुरा शामा फायरसमोरील परिसर.

डीएसपी टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवननगर बाहेती शाळा आदी, गिरणा टाकीवरून भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर मेहरुण भागातील राहिलेला परिसर, बुस्टर पंपावरून मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर-मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर, सद्‌गुरूनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोमवारी (ता. २२) नटराज टाकी ते चौघुले मळा पर्वतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवी पेठ, हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, केसी पार्क, गेंदालाल मिल हुडको-रिंगरोड संपूर्ण भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, आकाशवाणी टाकीवरून जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ,

हेमू कलाणी टाकीवरून गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर, डायरेक्ट सुप्रिम कॉलनी परिसर, डी.एस.पो. टाकीवरून साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर परिसरातील उर्वरित भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, चर्च रोड १५ इंची व्हॉलवरून प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, गिरणा टाकी आवारातील उंच टाकीवरून वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग नित्यानंद टाकीवरून समतानगर, स्टेट बँक कॉलनी, घोडेनगर, इक्बाल कॉलनी, मिल्लतनगर, पाण्याच्या टाकीचा परिसर.

मंगळवारी (ता. २३) वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदा रोड व परिसर, नित्यानंदनगर टाकीवरून मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर, हरविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरून इंडिकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी,.

खोटेनगर टाकीवरून द्रोपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरून शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाईप व शंकररावनगर व खेडी गाव परिसर, डीएसपी टाकीवरून तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, अयोध्यानगर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा होसींग सोसायटी, जगवानीनगर, सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर.