Jalgaon Crime News : स्विमींगचे दुसरेच कपडे देवून वॉटरपार्क कर्मचाऱ्यांना मारहाण | Waterpark employees were beaten up Jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon Crime News : स्विमींगचे दुसरेच कपडे देवून वॉटरपार्क कर्मचाऱ्यांना मारहाण

Jalgaon Crime News : शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी दुसऱ्याचे कपड़े आणून दिले.

डिपॉझीट परत करण्याची मागणी केल्याच्या वादातून वॉटर पार्क मधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करून बेदम मारहाण केली. (Waterpark employees were beaten up Jalgaon crime news)

या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी झुलेलाल वॉटर पार्कचे संचालक नीरज जेस्वानी यांनी पत्रकार आज परिषदेत केली.

झुलेलाल वॉटर पार्क येथे गेल्या २९ मेस रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास वॉटर पार्क फिरून झाल्यावर युवकांनी आपली कपड्याची रक्कम परत मागण्याच्या कारणावरून वॉटर पार्क मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

भवानी पेठ येथे राहणाऱ्या आर्यन प्रितेश भावसार यासह आई-वडील व भाऊ याच्यासह नातेवाईकांसोबत सोमवारी वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी आर्यन भावसार याचा चुलत भाऊ ओम भावसार याच्याशी याच ठिकाणी असलेल्या वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यांसोबत कपडे बदलण्याच्या कारणावरून बळजबरीने आरडाओरडा करून वाद निर्माण केला.

हा संपूर्ण घडलेला प्रकार वॉटर पार्कच्या जवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात आर्यन भावसार व त्याचा चुलत भाऊ ओम भावसार यासोबत सर्व नातेवाईक अशा सर्व मिळून एकत्रितपणे वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचे फुटेज आम्ही पोलिसांना दाखवले आहे. यात कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जेस्वानी यांनी केली.