जळगावचे तापमान ४१ अंशावर

अंगाची लाहीलाही, सावली अन्‌ गारव्याचा सर्वांना शोध
weather update temperature in Jalgaon 41 degrees
weather update temperature in Jalgaon 41 degreessakal

जळगाव : शहरासह जिल्ह्याचे तापमान बुधवारी (ता. १६) दुपारी चारला ४१ अंशावर पोचले. नंतर मात्र ४० अंशावर तापमान स्थिर झाले. जिल्ह्यात तापमानाचा पारा १६ ते २१ मार्च दरम्यान ४४ अंशापर्यंत जाईल, असा इशारा हवामान विभागाने अगोदरच दिला होता. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे.

जळगावचे तापमान मंगळवारी (ता. १५) ३९ अंश नोंदविले गेले होते. असे असताना ४४ अंश तापमान असल्यासारखे चटके लागत होते. बुधवारी ४१ अंशावर तापमान पोचल्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. अशातही अनेक जण तापमानापासून बचावात्मक साधनांचा वापर करून आपली नियमित कामे करताना दिसत आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाल

सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना दुपारी उन्हाचे चटके खात परीक्षेवरून घरी जावे लागत आहे. या परीक्षांमुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग दुपारी अडीचनंतर भरू लागले आहे. असह्य उन्हात काही विद्यार्थी सायकलीने तर काही व्हॅन, बसद्वारे येताना दिसतात. उन्हाचा तडाखा असह्य असल्याने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान भरविण्यात यावी, अशी मागणी पालक करू लागले आहे. शिक्षण विभागाने शाळेची वेळ बदलवण्यासाठी सूचना शाळांना देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com