new year
new yearsakal

जळगाव : सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाचे जल्लोषात स्वागत

अनेकांनी साजरा केला ‘थर्टीफर्स्ट’ घरीच; सायंकाळी बार, हॉटेल्स फुल

जळगाव : सरत्या वर्षाचा शेवटच्या दिवसावर कोरोनाचे सावट असले तरी, अनेकांनी घरी राहूनच हा दिवस घरच्यांसोबत साजरा केला. तर काहींनी बाहेर जाण्याचे नियोजन केल्याने सायंकाळी हॉटेल्स, बार तसेच पर्यटनस्क्षळांवर बऱ्यापैकी गर्दी झालेली होती.(welcome to the New Year Goodbye to last year)

new year
जळगावात तहसीलदाराला धक्काबुक्की करत चालकाला बेदम मारहाण

यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे रात्री नउनंतर जमावबंदी असल्याने अनेकांनी नउच्या आत हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबर साजरा केला. तर काहींनी घरीच राहत नववर्षाचे स्वागत जल्लोशात केले. संगणकीय युगात सोशल मीडियाचा वापर करत अनेकांनी एकमेकांना जुन्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करणारे संदेश दिले.(corona restrictions)

new year
जळगाव : मुलीच्या माहेरच्यांकडून व्याह्याला बेदम मारहाण

अनेकांनी वर्षाअखेरची सायंकाळ विविध हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंटमध्ये जावून विविध पदार्थ खावून साजरी केली. पाणीपुरी, पावभाजी, चायनिज पदार्थ, अंडापावच्या गाड्यांसह इतर खादय पदार्थ्यांच्या गाड्यावर सायंकाळनंतर गर्दी पहावयास मिळाली. अनेकांनी हॉटेल्समधील मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेत पाट्या केल्या. तर मद्यपान व मांसाहार करणाऱ्यांनी हॉटेल्स, बिअरबारमध्ये जावून सरत्या वर्षाला निरोप दिला. सर्वच ठिकाणची मटन मार्केटमध्ये शेकडो कोंबड्या, बकऱ्यांची मांसाहारासाठी कत्तल करण्यात आली. मध्यरात्री बाराला नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com