Tempreture News : जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रतितास 22 किलोमीटर; आज किरकोळ पावसाचा अंदाज

Rain Update News
Rain Update Newsesakal

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली आहे. दुसरीकडे सकाळी व रात्री गार वारे वाहू लागले आहेत. दिवसाही वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग २२ किलोमीटर प्रतितास झाला आहे.

तापमानात घसरण झाली असली, तरी उन्हाचा चटका लागत आहे. केरळात मान्सूनचे आगमन सुरू झाल्याने सोमवारी (ता. २९) जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ( wind speed in district is 22 kilometers per hour Temperature within 41 degrees for two days Light rain forecast today

Jalgaon news)

यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाळा कडक होता. याच महिन्यात तापमान ४७ अंशापर्यंत गेले होते. अतितापमानाने आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. दुसरीकडे तापमानातही घट झाली होती. मात्र, मे महिन्यापासून हीटचा तडखा नागरिकांना सहन करावा लागला.

यंदा पावसाळा उशीरा सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात ७ ते ८ जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र ते उशिराने होईल.

७ व ८ जूनला पाऊस येईल. मात्र, त्याचे प्रमाण अल्प असेल. तो पाऊस मान्सूनपूर्व गणला जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain Update News
Crime News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या का झाली? पोलिसांनी लावला छडा

शेतकऱ्यांची तयारी पूर्ण

मान्सूनपूर्व पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. बीटी बियाणे उपलब्ध नसले, तरी इतर राज्यातून किंवा मागील वर्षच्या शिल्लक बियाण्याची बागायतदार शेतकरी पेरणी करीत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकरी बियाणे उपलब्ध होण्याची वाट पाहत आहेत.

त्यांनी शेत पेरणी योग्य करून ठेवले आहे. पाऊस केव्हा येईल? आला तर तो सतत सुरू राहील, की मध्येच ब्रेक घेईल? याबाबत तर्कवितर्क आहेत. मात्र, मान्सूनचे वारे जिल्ह्यात वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Rain Update News
Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रेलिंगला धडकून कारला आग, होरपळून दोघांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com