
Jalgaon Crime News : महिलेला दिराकडून मारहाण
Jalgaon News : हरिविठ्ठलनगरमधील मराठी शाळेजवळ सोमवारी (ता. २२) कौटुंबीक वादातून घरातील सामान रस्त्यावर फेकून महिलेला दीरासह पुतण्याने मारहाण केली. (woman beaten by brother in law jalgaon crime news)
अश्विनी राहुल महाजन (वय २५) यांचे एकत्रीत कुटुंब असून, दीर संजय प्रल्हाद महाजन व इतर राहतात.
अश्विनी यांचा संजय महाजन यांच्यासोबत कौटुंबिक वाद झाला. संजय महाजन याने सामान घराबाहेर फेकून महिलेला घराबाहेर हाकलून दिले. नंतर संजय महाजन व पुतण्या विकास महाजन यांनी महिलेला काठीने मारहाण करून दुखापत केली, तसेच मोबाईलचे नुकसान केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संजय महाजन आणि विकास महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहे.