
Jalgaon Crime News: मुलास शाळेत नेणाऱ्या महिलेचा विनयभंग
जळगाव : मुलाला शनिवारी (ता. १८) सकाळी शाळेत घेऊन जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडून विनयभंग करण्यात आला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.
मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना, कादर खान फकीरा खान याने विवाहितेचा रस्ता अडविला. नंतर त्याने विवाहितेचा हात पकडून ‘माझ्याकडे खूप पैसे असून, माझ्यासोबत चल’, असे म्हणून त्याने महिलेचा विनयभंग केला. अचानक झालेल्या प्रकारामुळे विवाहिता प्रचंड घाबरुन गेल्या. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.
यापूर्वीही कादर खान विवाहितेच्या घरी त्यांच्या भावाचा मोबाईल क्रमांक घेण्याच्या बहाण्याने येत होता. मात्र, त्याला विवाहितेने घरी येण्यास मज्जाव केला होता. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. अखेर त्याने विवाहितेचा रस्ता अडवून विनयभंग केला.
याबाबत विवाहितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी तपास करीत आहे.