जळगाव : हतनूरच्या धर्तीवर आणखी एक मोठे धरण हवे

पाठपुराव्याची गरज; दरवर्षी शेकडो टीएमसी पाणी जातेय वाहून
World Water Day Tapi river big dam needed in Hatnur jalgaon
World Water Day Tapi river big dam needed in Hatnur jalgaon sakal

जळगाव : जिल्ह्यातून दरवर्षी हतनूर धरणातून तापी नदीमार्गे लाखो लिटर पाणी वाया जाते. ते आपल्याच जिल्ह्यात अडविण्यासाठी मोठ्या धरणाची गरज आहे. पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले, तर दरवर्षी हतनूर धरण २५ ते ३२ वेळा भरेल एवढे पाणी वाहून जाते, ते अडवण्यास मदत होईल व जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढेल.

गेल्या पावसाळ्यात तापी व गिरणा दोन्ही नद्यांमधून तब्बल १५ हजार ८६७ दलघमी एवढ्या पाण्याचा विसर्ग झाला. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे, १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्प नऊ वेळा भरले असते. एवढे पाणी तुमच्या-आमच्या डोळ्यांदेखत वाहून गेले. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पाणी अडवणार आहोत का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तापी, गिरणा जीवनवाहिन्या

जळगाव जिल्ह्यातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. ते भरल्यानंतर पाणी पुढे कुठेही अडविण्याची सोय नाही. त्यामुळे ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी दरवर्षी वाया जाते.

एवढे पाणी जातेय वाहून

मात्र, या वाया जाणाऱ्या पाण्याचे कोणालाही काही एक सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातून जून ते नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ हजार ८६७ दलघमी एवढे पाणी वाया गेले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची साठवण क्षमता एक हजार ४२७ म्हणजेच ५० टीएमसीहून अधिक आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दलघमी एवढी आहे. यंदाच्या पावसाळ्यात गिरणा धरणातून दोन हजार २१६ दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला. तर हतनूर धरणातून दहा हजार ७२५ दलघमी पाणी वाहून गेले. एवढ्या पाण्यातून हतनूर तब्बल ३० वेळा भरले असते.

गाळामुळे क्षमता घटली

हतनूरमधील गाळ काढण्याचा खर्च पाहता दुसरे हतनूर धरण तयार करता येईल. यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने नवीनहद नोट दळण्यासाठी नवीन हतनूर धरण तयार करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

भूजलपातळी गेली खोल

ग्लोबल वॉर्मिंग, जलप्रदूषण, बदलते जागतिक हवामान यामुळे पृथ्वीच्या पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे. ते पाणी मिळवणे आज खूप कठीण कार्य बनले आहे. ६००-८०० फूट कूपनलिका करून देखील त्याला पाणी लागत नाही म्हणजे ही धोक्याची घंटा आहे.

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. म्हणूनच पाणी फुकट घालवणं हा गुन्हा तर आहेच शिवाय निसर्गाच्या दृष्टीने पापही आहे.

-सुरेंद्र चौधरी, अभियंता व जल अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com