
Jalgaon Crime News : तलवारीचा धाक दाखवून कुटुंबियांना मारहाण
Jalgaon News : जुन्या भांडणाच्या कारणावरून देव्हारी (नशिराबाद) येथे एका तरुणासह कुटुंबियांना तलवारीचा धाक दाखवून बेदम मारहाण करण्यात आली. (young man and his family members were brutally beaten jalgaon crime news)
तलवारीच्या धाकावर तरुणाला ओलीस ठेवत कुटूंबीयांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
राहुल भगवान पाटील (वय ३२) हा तरुण देव्हारी येथे परिवारासह वास्तव्याला असून, शेती करून उदरनिर्वाह करतो. मंगळवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून गावातीलच रावसाहेब ऊर्फ गोलू रघुनाथ तायडे आणि नितीन ऊर्फ सोनू नामदेव पाटील (रा. उमाळा) या दोघांनी राहुल पाटीलला बेदम मारहाण केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याला तलवारीच्या धाकावर ओलीस धरुन त्याच्या कुटुंबिंयाना संपवुन टाकण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली.
घडल्या प्रकारानंतर राहुलने कुटूंबियांसह नशिराबाद पोलिस ठाणे गाठत, माहिती दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री नऊला नितीन पाटील आणि रावसाहेब तायडे या दोघांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे तपास करीत आहेत.