Sat, June 10, 2023

Jalgaon News : गुरूद्वाराजवळून दुचाकी लंपास
Published on : 14 March 2023, 3:00 pm
जळगाव : शहरातील आर. आर. शाळेजवळील गुरूद्वारा येथून एका तरुणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. (young man bike was stolen by thieves from Gurudwara jalgaon crime news)
शुभम दिलीप राठोड (वय २७, रा. गणेश कॉलनी) सकाळी अकराला आर. आर. शाळेजवळील गुरूद्वाराजवळ कामानिमित्त दुचाकीने (एमएच १९, सीए ६५१९) आला होता.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
दुचाकी उभी तो करून गेला. शुभम परत आल्यावर त्याची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. शुभमच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक गणेश पाटील तपास करीत आहे.