Jalgaon News : विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon News : विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

निंभोरी (जि. जळगाव) : विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १३) शहरातील जामनेर रस्त्यावरील आर्वे फाट्यावर घडली. (young man died after falling into well jalgaon news)

समाधान उफ बाळू पाटील (वय २३) हे मृत तरुणाचे नाव आहे.

अंतुर्ली (ता. पाचोरा) येथील रहिवासी समाधान पाटील हा बोहरी यांच्या शेतातील विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला. तो विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून तो विहिरीत पडला. काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने पाटील कुटुंब विहिरीकडे पळत गेले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

समाधान पडल्याची खात्री झाली असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. अखेर आर्वे येथील तडवी नामक तरुणाने त्यास बाहेर काढले.

तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. या वेळी पाटील कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaondeathyoung