Jalgaon Accident News : ट्रकच्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार | young man died on spot in accident with truck jalgaon accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Jalgaon Accident News : ट्रकच्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार

Jalgaon News : पिंप्री तालुका धरणगाव येथील धरणगाव जळगाव रोडवरील चैताली जिनिंग जवळ जवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुण जागीच ठार झाला.

गजानन पाटील (वय ४३, रा. वाघळूद ता.धरणगाव) असं मृत तरुणाच नाव आहे. (young man died on spot in accident with truck jalgaon accident news)

धरणगाव आणि पिंप्रीच्या दरम्यान, चैताली जिनिंगच्या पुढील नागमोडी वळणार दुचाकीस्वार तरुणाला आयशर (क्र. एम.एच.१८.बी.झेड.०६२२) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गजानन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांनी भेट दिली. दरम्यान, धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.