Jalgaon : गावातील तरुणानेच अल्पवयीन मुलीस पळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

Jalgaon : गावातील तरुणानेच अल्पवयीन मुलीस पळवले

जळगाव : कानळदा गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून (Kidnap) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील कानळदा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. (young man from village kidnapped a minor girl of same village Jalgaon Crime News)

हेही वाचा: अंधार अन्‌ हेडफोनने तरुणीचा घात!; भरधाव रेल्वेची जबर धडक

अल्पवयीन मुलीचे वडील शेतकरी आहेत. मुलगी रविवारी (ता. २२) सकाळी साडेअकरा वाजता घरातून अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या पालकांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मुलगी कुठेही आढळून आली नाही. मुलीच्या पालकांनी गावात राहणारा भावेश बळीराम बोरसे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात संशयित आरोपी भावेश बळीराम बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले

Web Title: Young Man From Village Kidnapped A Minor Girl Of Same Village Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime Against Girl
go to top