Jalgaon Crime News : गोलाणी मार्केटमध्ये तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : गोलाणी मार्केटमध्ये तरुणाची हत्या

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. रात्री सव्वादहाच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी पोहोचले आहेत.

पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविला असून, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा साक्षीदार असलेल्या एकाला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. जामनेर, यावल तालुक्यांतील खून प्रकरणानंतर रविवारी रात्री पुन्हा जळगाव शहरात खून झाला. तिन्ही खून प्रकरणातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :JalgaonCrime Newsdeath