Jalgaon Accident News : अमळनेर यात्रेसाठी आलेली तरुणी ठार | young woman died in an accident amalner jalgaon accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon Accident News : अमळनेर यात्रेसाठी आलेली तरुणी ठार

Jalgaon News : मेहेरगाव फाट्याजवळ यात्रेसाठी रिक्षातून जात असताना, दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली, तर दोन जखमी झाले. अश्विनी गुलाब भामरे, असे मृत तरुणीचे नाव आहे. (young woman died in an accident amalner jalgaon accident news)

दरम्यान, अश्विनीचे लग्न ठरले मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर काळाने घाला घातला. धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी रविवारी (ता. १४)खेडी खुर्द प्र. ज. (ता. अमळनेर) येथील मोठ्या बहिणीकडे आली होती.

रात्री साडेआठच्या सुमारास अश्विनी, तिच्या बहिणीची सासू, नणंद या दोघांसोबत रिक्षा (एमएच १९, बीजे ८९९६) तून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहीण आणि मेव्हणे दुचाकीवरून रिक्षासोबत मार्गस्थ झाले. मेहेरगाव फाट्याजवळ भरधाव टाटा मॅजीक (एमएच १९, बीजे १४०५) वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या धडकेत रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनी जागीच ठार झाली, तर रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्शल बोरसे जखमी झाले. रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात अश्विनीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डोळ्यासमोर लहान बहिणीचा मृत्यू बघून मोठ्या बहिणीने हंबरडा फोडला. जखमी रेखाबाई पाटील आणि वर्षा बोरसे यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Jalgaonwomenaccident case