Crime News : कपडे बदलताना शुटिंगच्या संशयावरून तरूणासह कुटूंबीयांना मारहाण | Youth beaten up on suspicion of shooting while changing clothes jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Crime News : कपडे बदलताना शुटिंगच्या संशयावरून तरूणासह कुटूंबीयांना मारहाण

Jalgaon News : शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वाटर पार्क येथे कपडे बदलतांना शूटिंग करत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला वाटरपार्क येथील ४ बाऊन्सर कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाटर पार्क येथील ४ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Youth beaten up on suspicion of shooting while changing clothes jalgaon crime news)

असह्य उन्हाळा आणि सुट्यांचा सिझन असल्याने तरण तलाव, वॉटरपार्क येथे प्रचंड गर्दी उसळत आहे. शिरसोली (ता. जळगाव)जवळ झुलेलाल वाटर पार्क आहे. या वॉटर पार्कमधील चार बाऊन्सर कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी आर्यन प्रितेश भावसार (वय १९, रा. भवानी पेठ, आठवडे बाजार, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सोमवारी (ता. २९) रात्री दहाच्या सुमारास कुटूंबियांसह झुलेलाल वॉटर पार्क येथे आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथे अंघोळीसाठी कपडे बदलत असताना चोरुन शुटींग करत असल्याच्या संशयावरुन आर्यन याला वाटरपार्कमध्ये कार्यरत असलेल्या ४ अनोळखी कर्मचाऱ्यांनी जाब न विचारता थेट मारहाण करून त्याचा कॅमेरा फेकून दिला.

तसेच, आर्यनसोबतच्या महिला-मुलींसह त्याच्या कुटूंबीयांना देखील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर आर्यन भावसार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.