Jalgaon Accident News : मेटॅडोर-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू | Youth dies in matador bike accident jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Jalgaon Accident News : मेटॅडोर-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : तालुक्यातील मेहू टेहू गावाजवळील वळणावर मालवाहू वाहन (४०७ मेटॅडोर) व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. १५) सकाळी नऊच्या सुमारास घडली. (Youth dies in matador bike accident jalgaon news)

आडगाव तांडा (ता. पारोळा) येथील रहिवासी भरत रामसिंग जाधव (वय २१) व दीपक छगन चव्हाण हे दोघेही आपल्या मोटारसायकलने (क्रमांक एमएच ०२, बीडब्ल्यू ३३२२) जात असताना त्यांना मालवाहू वाहन (टाटा ४०७ : एमएच ०४ सीए ६८७३) यावरील चालकाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलचालक भरत जाधव याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक चव्हाण हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) चालक आशुतोष शेलार व सहकारी यांनी जखमी व मृतास कुटीर रुग्णालयात आणले. या वेळी जखमी हा खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. दरम्यान,

या अपघाताची पारोळा पोलिस नोंद करण्यात आली आहे. हवालदार विनोद साळी तपास करीत आहेत.मालवाहू वाहन व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने आडगाव तांड्यावर शोककळा पसरली.

टॅग्स :JalgaonBikeaccident case