Jalgaon News : गिरणा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू | Youth drowned in Girna river Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : गिरणा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

Jalgaon News : तालुक्यातील गिरणा नदीत पोहत असताना फिट आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजू भुरा भिल (वय ३५, रा. पिंपळकोठा ता. एरंडोल) असे मृताचे नाव आहे. राजू भिल कुटुंबासह पिंपळकोठाला वास्तव्याला होता.

त्याला फिट येत असे. रविवारी (ता.२१) दुपारी एकला तो गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याला अचानक फिट आली. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Youth drowned in Girna river Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत माहिती मिळाल्यावरून जळगाव तालुका ठाण्याचे पोलिस कर्मचारी लीलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

नंतर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह नेला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक फौजदार लीलाधर महाजन, नरेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.