Jalgaon Crime News: उत्राण येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newssakal

कासोदा/उत्राण (ता. एरंडोल) : उत्राण अहीर हद्द (ता. एरंडोल) शिवारातील गिरणा नदीपात्राकडील ख्वाजा बाबा दर्ग्याजवळ वाळूच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना आज (ता. १९) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत कासोदा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : गँग्स्‌ ऑफ गेंदालालमील’चे तिघे हद्दपार; गुन्हेगारीवर पोलिस अधीक्षकांचा जालीम उपाय

अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथील वाळू व्यवसायात असलेल्या सचिन (सोनू) देविदास पाटील (वय ४०) हा तरुण उत्राण येथील गिरणा नदीपात्रातील ख्वाजाबाबा दर्गाजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्या ठिकाणी त्याच्या बुलेटचेही नुकसान केल्याचे दिसून आले. पोलिसांनी सांगितले, की दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपी नीलेश ज्ञानेश्वर देसले (रा. गिरड, ता. भडगाव) व इतर काही जणांसोबत मयत सचिनशी हाणामारी झाली होती.

त्यानंतर हे प्रकरण आपसांत मिटविण्यात आले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी सचिनला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संशयित नीलेश देसले याच्या सांगण्यावरून इतरांनी सचिन पाटील यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत किरण सुभाष पाटील (३७, रा. अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon Crime News
Jalgaon Crime News: मुलास शाळेत नेणाऱ्या महिलेचा विनयभंग

दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, तसेच उपविभागीय पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी भेट देऊन संबंधिताना योग्य त्या सूचना केल्या. तपास कासोदा पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक नीता कायटे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com