Board Exam : कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षा केंद्रांवर आढावा; जिल्हा परिषद सीईओंनी दिली शाळांना भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Board exam

Board Exam : कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षा केंद्रांवर आढावा; जिल्हा परिषद सीईओंनी दिली शाळांना भेट

जळगाव : इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी (Exam) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी

मंगळवारी (ता. २१) जिल्ह्यातील पाच शाळांना भेट देऊन पाहणी केली. (Zilla Parishad CEO visits schools to review copyfree campaign at exam centres jalgaon news)

या भेटीत कॉपीमुक्त परीक्षा अभियानाबाबत सूचनाही दिल्या. मंगळवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करण्यासाठी फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन उर्दू व ज्युनिअर कॉलेज यावल,

आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल सावदा, यशवंत विद्या व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर, ज्योती विद्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी (ता. यावल) येथे भेट देऊन पाहणी केली व कॉपीमुक्त अभियानाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ७६ परीक्षा केंद्रावर ४७ हजार ३७०, तर दहावीच्या परीक्षेसाठी १३८ परीक्षा केंद्रावर ५६ हजार ८६५ विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण, अशा स्वरूपात परीक्षा केंद्रांची वर्गवारी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर बैठे व भरारी पथक नियुक्त करण्यात आली आहेत.