यकृत दानाने वाचविले पित्याचे प्राण

प्रकाश पाटील
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सावर्डे - वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने वडिलांसाठी यकृताचा काही भाग आपल्या वडिलांना दान देवून जीवदान दिले. जूनमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली. नेहा हिचा येथे सत्कार करण्यात आला.

सावर्डे - वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने वडिलांसाठी यकृताचा काही भाग आपल्या वडिलांना दान देवून जीवदान दिले. जूनमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली. नेहा हिचा येथे सत्कार करण्यात आला.

मुळचे करजुवे येथील आणि सावर्डे येथे वास्तव्यास असलेले प्रकाश यशवंत नलावडे ( वय 62) यांना कावीळ झाली. सर्व उपचार थकल्याने कुटुंब हतबल झाले होते. घरचा कर्ता पुरुष अंथरुणावर एक वर्ष खिळून होता. तपासणीत यकृत पूर्णतः खराब झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण सांगितले. मुंबईत केईएम रुग्णालयात यकृत उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कळविले जाईल, असे सांगितले. तीन महिने गेले.

नेहा प्रकाश नलावडे (वय 22) या त्यांच्या मुलीने वडिलासाठी स्वतःचे यकृत देण्याचे धाडस दाखवले. नेहाने आपल्या यकृतचा तुकडा वडिलांना दान केला. वडिलांना जीवदान मिळाले. अवयवदानाचे समाधान आणि त्याहीपेक्षा वडिलांना जीवदान दिल्याचा आनंद आजही तिच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहताना दिसतो. नेहा बीएएमएस शिक्षण घेत आहे. ती लोकांना अवयवदानाचे महत्व पटवून देते. कॅन्सर अवयवदानाने बरा होतो. हे ती पटवून देते.

मानवी शरीरातील यकृत आपल्या केस आणि नखासारखा आहे. त्याचा काही भाग दुसर्‍याला दिल्यास तो दिलेला भाग भरुन निघतो. ज्याला दिला त्याच्यामध्येही वाढ होते.

- रजनी नलावडे (नेहाची आई)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl donate Liver to save fathers life