कागलच्या डॉक्‍टरांचा पर्यावरण संवर्धनाला हातभार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कागल- : कागल तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनतर्फे पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने कागल नगरपालिकेला दहा हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.

कागल- : कागल तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनतर्फे पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने कागल नगरपालिकेला दहा हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे नागरिकांना सेवा देत असलेल्या कागलच्या डॉ. एन. एस. चौगुले, डॉ. कमलाकर मेंच, डॉ. सतीश मेंच व डॉ. ए. आर. उडपी यांना ‘धन्वंतरी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १०) सकाळी १० वाजता येथील शाहू सभागृहात हा सोहळा होणार आहे. 

कागल तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले. पहिला वर्धापन दिनही सामाजिक उपक्रमानेच करण्याचे ठरले. सध्या प्लास्टिक कॅरिबॅग हा पर्यावरणातील मोठा अडथळा आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कापडी पिशवी हाच पर्याय आहे. पर्यावरण संवर्धनात आपलाही सहभाग असावा, या उद्देशाने कापडी पिशव्या देणार आहोत.

- डॉ. तुषार भोसले

अध्यक्ष डॉ. तुषार भोसले म्हणाले, ‘अत्याधुनिक साधने नसतानाही पूर्वीच्या काळी ज्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली व आजही लोकविश्‍वासार्हतेच्या जोरावर वैद्यकीय सेवा देत असलेल्या ज्येष्ठ डॉक्‍टरांचा गौरव करण्यात येईल. नव्या पिढीसमोर ते आदर्श आहेत. या डॉक्‍टरांना ‘धन्वंतरी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.’ 

यात कागल शहरातील डॉ. एन. एस. चौगुले, डॉ. कमलाकर मेंच, डॉ. सतीश मेंच व डॉ. ए. आर. उडपी यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता येथील शाहू सभागृहात हा सोहळा होणार आहे. 

गुजरातमधून पिशव्या मागितल्या
गुजरात येथील पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून कापडी पिशव्या मागवून घेतल्या. वजनाने हलकी व खिशात सहज बसेल अशी ही पिशवी सुमारे ५ किलोपर्यंतचे वजन पेलू शकते. अशा दहा हजार पिशव्या कागल नगरपालिकेला देऊन त्या शहरातील घराघरांत पोच करण्याची व्यवस्था केली आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, तहसीलदार किशोर घाडगे, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयकुमार गवळी, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे, निहा (कोल्हापूर) चे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश साने, खजिनदार डॉ. सूरज कडाकणे, डॉ. तुषार कोरवी आदी
उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News cloth bags distribution by Doctor in Kagal