ऊसतोड कामगारांची २६० मुले शाळेत

प्रकाश कोकितकर
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

सेनापती कापशी - केल्याने होत आहे रे... असाच अनुभव कागल तालुक्‍यातील शिक्षण विभागात आला आहे. तालुक्‍यातील शिक्षकांनी सलग चार दिवस काम करून चक्क २६० ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना थेट शाळेत आणून बसविले. राज्यातील १३ जिल्ह्यांतील ही मुले आहेत. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी योगदान दिले. नियोजनबद्ध केलेला हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.  

शासनाची मोहीम म्हणून दरवर्षी शालबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. मात्र, त्यापुढे गाडी सरकलीच नाही. या वर्षी मात्र गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबविली.

चार दिवसांत संपूर्ण कागल तालुक्‍यातील ऊसतोडणी कामगारांच्या पालावर भेट देऊन २६० मुलांची नोंदणी नव्हे तर त्यांना शाळेत आणले. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यातील १९५ मुलांचा समावेश आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, बीआरसी कर्मचारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी मनावर घेऊन काम केल्याने हे शक्‍य झाले. दरवर्षी गळीत हंगामाच्या चार महिन्यांच्या काळात ही मुले शाळेबाहेर राहतात. परिणामी पुढे त्यांच्या हातात ऊस तोडणीचा कोयताच येतो. तो दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. नियोजन करून संपूर्ण तालुक्‍यातून त्याची माहिती जमविण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतची मुले असून जिल्हानिहाय त्यांची संख्या अशी ः बीड (१९५), विजापूर (६), उस्मानाबाद (२३), अहमदनगर (२), सांगली (१), परभणी (७), जालणा (६), औरंगाबाद (३), लातूर (२), सोलापूर (६), बुलढाणा (३), नांदेड (४), हिंगोली (२). 

Web Title: Kolhapur News Out-of-school students issue solved