सरनोबतवाडीत लोकसहभागातून विहीर खोदाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कोल्हापूर - लोकसहभागातून गावचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय सरनोबतवाडीतील गावकऱ्यांनी घेतला आहे. विहिरीसाठी श्रीकांत वसंतराव माने या शेतकऱ्याने पाच गुंठे जागा दान दिली. ग्रामपंचायतीकडे याची नोंद झाली. लोकनियुक्त सरपंच उत्तम माने यांनी वाढदिनाचा डिजिटल फलकांसह इतर खर्च टाळून एक लाख दहा हजार रुपये खोदाईसाठी दिले.

कोल्हापूर - लोकसहभागातून गावचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय सरनोबतवाडीतील गावकऱ्यांनी घेतला आहे. विहिरीसाठी श्रीकांत वसंतराव माने या शेतकऱ्याने पाच गुंठे जागा दान दिली. ग्रामपंचायतीकडे याची नोंद झाली. लोकनियुक्त सरपंच उत्तम माने यांनी वाढदिनाचा डिजिटल फलकांसह इतर खर्च टाळून एक लाख दहा हजार रुपये खोदाईसाठी दिले. त्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून आज विहीर खोदाईला प्रारंभ झाला.

गाव करेल ते राव काय करेल, असाच प्रत्येय  यातून आला आहे. केवळ सरकार आणि प्रशासनावर अवलंबून न राहता लोकसभागातून पाणी प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून एक वेगळा आदर्श गावकऱ्यांनी घालून दिला आहे.

शहराला लागून असलेले हे गाव आहे. टेकडीवर असल्यामुळे तेथे पाणी पुरवठा करण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होतात. पाण्यासाठी टाकीही उभारली आहे. कुपनलिकेच्या माध्यामतून टाकीत पाणी साठविले जाते आणि तेच  पुढे गावाला वाटले जाते अशी तेथील स्थितती आहे. यात जीवन प्राधिकरण नळपाणी योजनेतून येणारे अनियमित पिण्याचे पाणी, कूपनलिकेची खालावलेली पाणी पातळी याला गावकरी कंटाळलेले होते. अखेर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे लोकसहभागातून विहीर खोदाई करण्याचा निर्णय झाला.

त्यासाठी शेतकरी श्रीकांत माने यांनी  जागा दिली आणि या विहिर खोदाईचा उद्‌घाटन सोहळा आज  झाला. लोकनियुक्त सरपंच उत्तम कृष्णात माने, मार्गदर्शक खंडेराव माने उपस्थिती होते. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह खर्चाच्या पाण्यासाठी होणारी डोकेदुखी यामुळे कमी होईल, असा गावकऱ्यांचा विश्‍वास आहे. पावसाचे घटते प्रमाण, लहरीपणामुळा व  वाढणारी लोकसंख्या यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.

ग्रामपंचायत सदस्या पूजा खोंद्रे-तोरस्कर, रूपाली शिंदे, छाया कांबळे, कुंदन कोळी,आशिष कांबळे, ग्रामसेवक भारत सातपुते, पोलीस पाटील विजय सादळेकर,समिती अध्यक्ष प्रताप गजबर, उपाध्यक्ष बाबासो येरङोळे, खजानिस राहुल गजबर, आशिष माने, सचिव संतोष माने, शिवाजी पांडुरंग माने, महिपती माने आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांनी ठरविले तर काय होऊ शकते हे यातून दिसू आले आहे. गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीतूनच आज  अगद गजबर, सुधाकर आडसुळ, महिपती माने, नितीन नायकवडे, विश्वास माने, सुनील कुंभार, सुबोध गजबर, हंबीरराव गजबर आदींच्या नियोजनातून विहिरीची खोदाई सुरू झाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Sarnobatwadi Well digging special story