वाढदिवसाच्या उधळपट्टीला फाटा देत स्वामी ग्रुपची विद्यार्थांना मदत

रवींद्र पाटील
शुक्रवार, 27 जुलै 2018

कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद स्वामी हे एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्या दिवशी सामाजिक कार्यास मदत केली. असाच वाढदिवस आपल्या दुकानातील  सहकाऱ्यांनीही करावा, असा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्यास संमती दिली आणि वर्षभर सर्वांच्या वाढदिवसानिमित्त निधी गोळा केला. दोन वर्षे हा उपक्रम राबविल्यानंतर स्वामी यांच्या मित्रांनीही त्यात सहभाग घेतला आणि स्वामी ग्रुपच्या उपक्रमास व्यापक रूप प्राप्त झाले.

वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. केशकर्तनालयात काम करून शिकत असताना स्वामी ग्रुपने माझ्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावल्याने शिक्षणास उभारी मिळाली.
-प्रमोद चव्हाण,
विद्यार्थी

गेल्या पाच वर्षांत स्वामी ग्रुपने विविध सामाजिक उपक्रम राबविले, त्यांत प्रामुख्याने अनाथाश्रमातील मुलांसमवेत भाऊबीज, वृद्धाश्रम, साखर शाळेतील मुले, मतिमंद शाळेतील मुलांना मदत, पाणपोई, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबविले.

नुकताच स्वामी ग्रुपच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ‘सकाळ’चे बातमीदार प्रा. रवींद्र पाटील, शैलेश चव्हाण, विवेक स्वामी, तानाजी पाटील, संजय जाधव यांच्या हस्ते केले. या वेळी सुरेखा स्वामी, वर्षा कोरे, स्नेहल स्वामी, सागर कोले, सचिन सुतार, दत्ता कचरे, राजू गोंधळी, दगडू जगताप, टिपू सनदी, दीपक पाटील, अलंकार हिरेमठ, विनोद स्वामी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News swami Group help to needy students