esakal | जागतिक टपालदिनी दहिवडीत विद्यार्थ्यांकडून पोस्टमनकाकांचा सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक टपालदिनी दहिवडीत विद्यार्थ्यांकडून पोस्टमनकाकांचा सत्कार

डाकसेवकांचा सत्कार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता.

जागतिक टपालदिनी दहिवडीत विद्यार्थ्यांकडून पोस्टमनकाकांचा सत्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिजवडी : जागतिक टपालदिनाचे औचित्य साधून दहिवडी पोस्ट कार्यालयास जिल्हा परिषद शाळा दहिवडी नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत टपाल दिन साजरा करण्यात आला. 

पोस्ट कार्यालयाची कार्यपद्धती, प्रशासनाबाबत पोस्टल बॅंकेचे असिस्टंट एस. एस. अवघडे यांनी विस्तृत माहिती दिली. बॅंकेच्या विविध योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही दिली. पिनकोड, मनिऑर्डर, तिकिटे, आधार कार्ड याबाबतीत सखोल माहिती दिली. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली. मुलांनी मनिऑर्डर, डेट स्टॅम्प, राखी कशी पोचते, पैसे कसे भरायचे आणि काढायचे, कसे पाठवायचे यांसारख्या मुलांच्यात कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांची मुलांना समजतील अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली व मुलांच्या भाषेत समजावून सांगितले.

पोस्ट मास्तर, कर्मचारी आणि पोस्टमनकाका या सर्वांचा गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दैनंदिन जीवनात वावरताना पोस्ट कार्यालयाबाबतची वेगळी माहिती मिळाल्यामुळे मुलांमध्ये समाधान व्यक्त होत होते. डाकसेवकांचा सत्कार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता.
 
या वेळी पोस्टल असिस्टंट एस. जी. काकडे, पोस्टमन एस. एम. जाधव, पोस्टल असिस्टंट हनिबिस्ट, कर्मचारी कालिदास कुंभार, पोस्टमनकाका अनुक्रमे शशिकांत जाधव, शंकर निंबाळकर, विश्वनाथ बोराटे, दहिवडी नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण, उपशिक्षक मोहनराव जाधव, संध्या कदम, शिक्षक उपस्थित होते. उपशिक्षक सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

loading image