ध्वनिप्रदूषण केल्यास होणार 5 वर्षे तुरुंगवास व दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

पुणे- तुम्ही तुमच्या परिसरात कार्यक्रम जरूर घ्या, मात्र उत्साहाच्या भरात आवाज वाढवून ध्वनिप्रदूषण केलेत तर सावधान..! आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात येईल. 

विविध सण, उत्सव व इतर कार्यक्रमांमधूनही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गोंगाटामुळे नाहक त्रासलेले नागरिक सतत नाराजी व्यक्त करीत असतात. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही अशी तक्रार असते... हे लक्षात घेऊन आता येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात ध्वनिप्रदूषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. 

या पथकाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप कुलकर्णी (मो.- 9422313295) यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

उपनिरीक्षक डी.डी. कारंडे- 8888861498,

बी.जी. शेख- 9823227886,

यु.बी. रजपूत- 7774034142,

आर.एस. चौधर- 9823323225 यांचा या पथकात समावेश आहे. 

निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 15 (1) प्रमाणे गुन्हा असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यास पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

ध्वनिक्षपकासाठी कर्णे (डीजे) वापरू नयेत. त्याऐवजी 2 स्पीकर्स बॉक्स वापरावेत. दोनपेक्षा जास्त स्पीकर्स लावू नयेत असे पोलिसांनी सूचित केले आहे. शहरातील विविध भागांनुसार आवाजाच्या मर्यादा निश्चित केल्या असून, त्याचे उल्लंघन होणार याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ध्वनिप्रदूषण विषयक नियमानुसार लाउड स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवून आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यावेळी फटाके वाजवू नयेत. लाउड स्पीकरचा वापर दिलेल्या वेळेतच करावा, तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांच्या परसिरात किमान शंभर मीटरपर्यंतच्या क्षेत्रात कोणत्याही वेळी लाउड स्पीकरंचा वापर करता येणार नाही. 

या अटींचा भंग केल्यास संबंधितांचा लाउड स्पीकरचा परवाना रद्द करून चालक व मालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल.