Video : असे चित्र पाहून व्हाल थक्क; चित्रकाराचे वयं ऐकाल तर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

अवघ्या आठ महिन्याचा असतानाच अद्वैतने रंगांशी मैत्री केली. त्याला खेळायला रंग मिळाले नाहीत की, तो लगेच रडायला लागायचा. आई वडीलांनीही त्याची चुनूक बघून त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. 

पुणे : नाव अद्वैत कोलारकर, वय वर्ष अवघे पाच. पण, कॅनव्हॉसवर चित्र काढताना अनुभवी व्यावसायिक चित्रकारच असल्याचा भास होतो. त्याच्या या चित्रकलेतील बुद्धीमत्तेच्या जोरावर पुण्याच्या या बालकाने चक्क जगातील सर्वात हुशार अशा 100 जणांमध्ये स्थान प्राप्त करत 'ग्लोबल चाईल्ड प्रोडिजी' हा पुरस्कार प्राप्त केला आहे. 

नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पाँडेचरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनीही त्याचे कौतुक केले. 

अवघ्या आठ महिन्याचा असतानाच अद्वैतने रंगांशी मैत्री केली. त्याला खेळायला रंग मिळाले नाहीत की, तो लगेच रडायला लागायचा. आई वडीलांनीही त्याची चुनूक बघून त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Advait Kolarkar (@advaitkolarkar) on

अद्वैत दोन वर्षांचा असताना त्याचे पुण्यातील 'आर्ट टू गॅलरी' येथे 'अद्वैत क्रिएटीव्ह वर्ल्ड' हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. जानेवारी 2018 मध्ये कॅनडातील चित्र प्रदर्शनात तर एप्रिल 2018 मध्ये अमेरीकेतील न्यूयॉर्क येतील आर्ट एक्‍सपोध्ये तो सहभागी झाला होता. तेथे अनेकांनी त्याची चित्र विकत घेतली होती. 

जगातील हुशार मुलांची निवड करण्यासाठी 'ग्लोबल चाईल्ड प्रोडिजी अवार्ड'साठी (जीसीपीए) अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये जगभरातील 45 देशांमधून विविध क्षेत्रातील 15 हजार मुलांनी प्रवेशिका सादर केल्या होत्या. त्यातून अद्वैतची पहिल्या 100 बुद्धीमान मुलांमध्ये निवड करण्यात आली.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Advait Kolarkar (@advaitkolarkar) on

अद्वैतची आई श्रृती कोलारकर म्हणाल्या, ''अद्वैतला अगदी लहानपणापासून रंग व चित्र काढणे आवडत होते. एवढ्या लहान वयात त्याच्यात ही क्षमता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला प्रोत्साहन दिले. चित्रकलेच्या जोरावरच जगातील 100 बुद्धीमान मुलांमध्ये अद्वैतची निवड झाली आहे याचा अभिमान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advait kolarkar from Pune is win Global Child Prodigy as worlds smartest Child