रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

वारजे माळवाडी - प्रवाशी महिलेचे रिक्षात विसरलेले अडीच लाख रुपये चालकाने प्रामाणिकपणे पोलिस ठाण्यात आणून दिले. याबद्दल वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अनुजा देशमाने यांनी चालक मारुती एकनाथ मोरे (वय 62, गोकूळनगर, वारजे माळवाडी) यांचा सत्कार केला. 

तुलसी गुप्ता (वय 45) या अहमदाबादहून आल्या होत्या. खासगी बसने त्या वारजे माळवाडीत महामार्गावर उतरल्या. तेथून त्यांना पद्मावतीला जायचे होते. म्हणून त्या मोरे यांच्या रिक्षात बसल्या. मोरे यांनी त्यांना वारजे माळवाडीच्या चौकात सोडले. रिक्षातून उतरल्यानंतर पैशाची बॅग रिक्षात विसरल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार, पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत होते. त्यापूर्वीच मोरे बॅग घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्यांनी बॅग पोलिसांना दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. गुप्ता यांनीही त्यांचे आभार मानले. 

Web Title: auto-rickshaw drivers returning money