युरोपातील सर्वोच्च शिखरावर कोल्हापूरचा तनिष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - मूळचा कोल्हापूरचा; परंतु सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या तनिष सुधीर खोतने वयाच्या तेराव्या वर्षीच युरोपातील माउंट एल्ब्रस हे सर्वोच्च हिमशिखर सर केले. 12 जुलै 2016 रोजी त्याने एल्ब्रस शिखरावर तिरंगा फडकवला. या शिखराची उंची 5642 मीटर असून सात खंडांमध्ये हे पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. एव्हरेस्टवीर चेतन केतकर यांच्या नेतृत्वाखाली त्याने ही किमया साधली. 

तनिषने माउंट एल्ब्रस सर करणारा आशियातील युवा गिर्यारोहक म्हणून मान मिळविला. यापूर्वी 1874 मध्ये एल्ब्रसवर प्रथम चढाई झाली होती. डेन्मार्कचा टाइलर आर्मस्ट्रॉंग हा एल्ब्रस शिखर सर करणारा जगातील सर्वात युवा गिर्यारोहक आहे. 

या मोहिमेविषयी माहिती देताना तनिष म्हणाला, की 2 जुलै 2016 ला मोहिमेसाठी आम्ही पुण्यातून रवाना झालो. माउंट एल्ब्रस हिमशिखर चढाईसाठी आव्हानात्मक मानले जाते. चेतन केतकर आणि थ्री पॉइंट ऍडव्हेंचर्स यांनी केलेले मार्गदर्शन चढाईच्या वेळी महत्त्वाचे ठरले. हिमभेगा, जोरदार हिमवृष्टी, वेगाने वाहणारे वारे यांसारख्या अडचणींवर मात करत 12 जुलैला सकाळी 9 वाजता आम्ही शिखरावर पाऊल ठेवले. 

या मोहिमेमध्ये सुधीर खोत, निगडीची ऋतुजा शहा यांनीही हे शिखर सर केले. तनिषचे वडील सुधीर खोत व्यवसायानिमित्त पुण्यात राहतात. ते मूळचे कोल्हापुरातील आहेत. तनिष सिंहगड स्प्रिंगडेल हायस्कूलमध्ये आठवीत शिकतो.

Web Title: Europe's highest peak Kolhapur tanish