कोविड योद्‌ध्यांना विमा संरक्षक कवच; विंगमधील 34 कर्मचाऱ्यांना लाभ

विलास खबाले
Friday, 30 October 2020

कोविड योद्धा ग्रुपने ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ग्रुपने विमा सुरक्षा कवच म्हणून कोरोना योद्‌ध्यांचा विमा उतरवला आहे. सहा आशा सेविका, नऊ मदतनीस, 11 अंगणवाडी सेविका व आठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यातील कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्यास त्यास मोफत उपचारासह 50 हजार रुपयांचा विमा मिळेल.

विंग (जि. सातारा) : कोरोना संसर्गात प्रत्यक्ष मैदानात जिवाची बाजी लावून लढणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून विमा संरक्षक कवच देऊन विमा पावतीचे वितरण करण्यात आले. येथील कोविड योद्धा ग्रुपने त्यासाठी पुढाकार घेतल्याने 34 कोरोना योद्‌ध्यांना विम्याचा लाभ मिळाला. 

कोविड योद्धा ग्रुपने ऑक्‍सिजन मशिनही उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ग्रुपने विमा सुरक्षा कवच म्हणून कोरोना योद्‌ध्यांचा विमा उतरवला आहे. सहा आशा सेविका, नऊ मदतनीस, 11 अंगणवाडी सेविका व आठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यातील कर्मचाऱ्यास कोरोना संसर्ग झाल्यास त्यास मोफत उपचारासह 50 हजार रुपयांचा विमा मिळेल. ग्रुपतर्फे विकास माने, संपतराव खबाले, धैर्यशील घोरपडे, सचिन पाचुपते, विकास पाटील, डॉ. अर्चना यादव, आरोग्य सेविका प्रगती जाधव, ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे, तलाठी गणेश तडाके यांच्या हस्ते विमा पावत्यांचे वाटप झाले. 

खटावातील आरोग्य केंद्रांना श्वास; सभापती घार्गेंचा पुढाकार

आरोग्य उपकेंद्राच्या आशा सेविका विनया पाचुपते, सुषमा कणसे, वर्षा रौंदाळे, सरिता खबाले, भाग्यश्री पाटील, उषा सोनावले, मनीषा कुंभार यांच्यासह 34 कर्मचाऱ्यांना लाभ झाला. विकास माने यांचे विशेष कौतुक करण्यात आले. किसन रोंगटे यांनी प्रास्ताविक केले. प्रगती जाधव यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 34 Employees In The Wing Will Get Insurance Satara News