भारीच! वाई पालिकेने खरेदी केली स्वत:ची रुग्णवाहिका, रुग्णांना होणार लाभ

भारीच! वाई पालिकेने खरेदी केली स्वत:ची रुग्णवाहिका, रुग्णांना होणार लाभ

वाई (जि. सातारा) : वाई पालिकेत दाखल झालेल्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्‍य होणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी नमूद केले. आमदार पाटील सूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 14 व्या वित्ता आयोगांतर्गत प्रस्ताव सादर करून पालिकेने 16 लाख 51 हजार 412 रुपये किमतीची अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त रुग्णवाहिका व 16 लाख 48 हजार रुपये किमतीची शववाहिनी खरेदी केली आहे. ही दोन्ही वाहने नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झाली आहेत. 

त्याचा लोकार्पण सोहळा आमदार पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, तहसीलदार रणजित भोसले आदींच्या उपस्थितीत झाला.

आमदार पाटील म्हणाले, "कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून शहरासह लगतच्या परिसरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. संशयित अथवा विषाणू संसर्गाने बाधित असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही पालिकेवर आहे. या कोरोना बाधितांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी रुग्णवाहिका व शववाहिकेची आवश्‍यकता होती. ती गरज आज पूर्ण झाली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com