esakal | बामणोली आरोग्य केंद्राच्या मदतीला धावला 'भैरवनाथ'!
sakal

बोलून बातमी शोधा

बामणोली आरोग्य केंद्राच्या मदतीला धावला 'भैरवनाथ'!

जावळी तालुक्‍यात शैक्षणिक पॅटर्न अंतर्गत गावोगावी समाज सहभागातून आयएसआय शाळा बनवल्या गेल्या. त्याचप्रमाणे कोरोना महामारीत जीव वाचवणारी आरोग्य केंद्रे स्मार्ट व सर्व सुविधांनीयुक्त व्हावीत, यासाठी जावळी तालुक्‍यात जनमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बामणोली आरोग्य केंद्राच्या मदतीला धावला 'भैरवनाथ'!

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : कोरोना रोगाची पाळेमुळे ग्रामीण भागात घट्ट होऊ लागली आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठ्या प्रमाणात विविध साधनांची कमतरता जाणवत असल्याची बाब लक्षात घेऊन बामणोली येथील भैरवनाथ बोट क्‍लबच्या माध्यमातून केंद्राला दहा हजार रुपयांचा निधी देण्यात आला. 

जावळी तालुक्‍यात शैक्षणिक पॅटर्न अंतर्गत गावोगावी समाज सहभागातून आयएसआय शाळा बनवल्या गेल्या. त्याचप्रमाणे कोरोना महामारीत जीव वाचवणारी आरोग्य केंद्रे स्मार्ट व सर्व सुविधांनीयुक्त व्हावीत, यासाठी जावळी तालुक्‍यात जनमोहीम सुरू करण्यात आली असून, अनेक दानशूर व्यक्ती योगदान देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निधी देण्यात आला.

पुळकोटी आरोग्य केंद्रास देसाई उद्योग समूहाचा मदतीचा हात 

या प्रसंगी बोट क्‍लबचे अध्यक्ष धनाजी पाटील यांनी विभागातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एक बेड द्यावा, असे आवाहन केले. माजी सरपंच राजेंद्र संकपाळ यांनी बामणोली विभाग दुर्गम असून, सर्वांनी सहकार्य केल्यास बामणोली येथे कोरोना सेंटर उभे करता येईल. त्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास विभागातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. आरोग्य केंद्राचे डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी बोट क्‍लबचे आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top