तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

गजेंद्र वाढोणकर यांची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियात नोंद
औरंगाबाद - तांदूळ, तीळ, मोहरी यावर एक नव्हे, तर सात ग्रंथ लिहिणारा कलाकार गजेंद्र वाढोणकर यांच्या कलेची अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने नोंद घेतली आहे. त्यांनी लिहिलेल्या सुखमणी साहिब पाठ व साईचरित्राची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी सात ग्रंथ लिहिले असून, यापुढेही स्वामी समर्थ यांच्यावर ग्रंथ लिहीत आहेत. या कलाकाराचा बुधवारी (ता.२३) प्राप्तिकर विभागाचे प्रधान प्राप्तिकर आयुक्‍त शिवदयाल श्रीवास्तव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. अमेझिंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी पवन सोळंकी, विजय कोते पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे गजेंद्र वाढोणकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यानंतर हा सत्काराचा कार्यक्रम झाला. या वेळी वाढोणकर म्हणाले, ‘‘वयाच्या २५ व्या वर्षापासून प्रयत्न करीत होतो. २००८ मध्ये गुरुत्ता गद्दीच्या वेळी सुखमणी साहिब पाठ हा ग्रंथ लिहिला. तो नांदेड गुरुद्वाराला अर्पण केला. त्यानंतर साई सत्‌चरित्राचा सार साई लीलामृत हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ शिर्डीला साईबाबांच्या चरणी अर्पण केला. असे सात ग्रंथ लिहिले आहेत.
 अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर आल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊस, ओबामांची बायोग्राफी हे तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहून भेट देण्यात आले. यासाठी २४ दिवसांचा कालवधी लागला.’’ कार्यक्रमात प्राप्तीकर विभागाचे प्रधान आयुक्‍त शिवदयाल श्रीवास्तव म्हणाले, ‘‘ गजेंद्र वाढोणकर हा अद्‌भूत शक्‍ती लाभलेला कलाकार आहे. त्यांचा सन्मान म्हणजे शहराचा अभिमान आहे. 

अजून असे कलाकार तयार व्हायला हवेत.’’ या वेळी धूपखेडा संस्थानचे बलदेव भारती, राजेंद्र काळे, पाथरी संस्थानचे संजय भुसारी, दिलीप गांधी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathwada news 7 book printed on rice, til & mohari