मुरूम टाकून बुजविले वृद्धाने स्वखर्चाने खड्डे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

करमाड - अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेला करमाड ते लाडसावंगीदरम्यानचे खड्डे एका वृद्धाने स्वखर्चातून बुजविले आहेत. रस्त्यावर करमाड गावाच्या हद्दीतच मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. शुक्रवारी (ता. २८) मुरूमखेडा (ता. औरंगाबाद) येथील तात्याबाबा यात्रोत्सवातून सायंकाळी परतणारे दहा ते पंधरा दुचाकीचालक भाविक येथील श्रीराम मोटर्ससमोरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने या चिखलमय खड्ड्यात पडून किरकोळ जखमी झाले. त्याविषयीची माहिती समजल्यावर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कचरू ऊर्फ आबा उकर्डे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली. मात्र, हातावर हात ठेवून न बसता त्यांनी शनिवारी (ता.

करमाड - अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेला करमाड ते लाडसावंगीदरम्यानचे खड्डे एका वृद्धाने स्वखर्चातून बुजविले आहेत. रस्त्यावर करमाड गावाच्या हद्दीतच मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. शुक्रवारी (ता. २८) मुरूमखेडा (ता. औरंगाबाद) येथील तात्याबाबा यात्रोत्सवातून सायंकाळी परतणारे दहा ते पंधरा दुचाकीचालक भाविक येथील श्रीराम मोटर्ससमोरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने या चिखलमय खड्ड्यात पडून किरकोळ जखमी झाले. त्याविषयीची माहिती समजल्यावर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कचरू ऊर्फ आबा उकर्डे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली. मात्र, हातावर हात ठेवून न बसता त्यांनी शनिवारी (ता. २९) स्वतःच्या ट्रॅक्‍टरच्या नागंराच्या साहाय्याने अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावरील पाणी बाजूला काढत खड्डे मुरूम टाकून बुजविले. दरम्यान, साठीतील कचरू उकर्डे हे स्वतः काम करीत असल्याचे पाहून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. काहींनी आबांना या कामात मदतही केली. 

जालना महामार्गापासून लाडसावंगीकडे जाणारा हा रस्ता मागील काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. या रस्त्यावर महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पाचशे मीटर सिमेंट रस्त्याचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. या कालावधीत फक्त एका बाजूच्या नालीचे पन्नास टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. येथून नाली खोदकाम, रस्ताकामाचे साहित्य व जागोजागी पडलेले खड्डे चुकवीत दुचाकी चालविणे म्हणजे कसरतच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news marmad pothole Senior Citizen