बाबूरावांसारखा कलावंत जन्मावा लागतो! 

दीपिका वाघ 
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

बाबूराव वाघमारे एक असं व्यक्तिमत्त्व की गेल्या तेवीस वर्षांपासून त्यांच्या हातात कोणतीही वस्तू द्या. त्यापासून एक भन्नाट कलाकृती निर्माण होणारच. मग ते लाकूड असो फळभाज्या असो बर्फ असो वा काहीही असो... बरं, हे सर्व तयार करायला त्यांना केवळ पंधरा मिनिटेच लागतात. या वस्तू बनवताना ते एकांत ठिकाणी तयार करत नाही तर सर्वांसमोर तयार करतात. ते कलाकृती तयार करण्याच्या विश्‍वात रमले आहेत. 

बाबूराव वाघमारे एक असं व्यक्तिमत्त्व की गेल्या तेवीस वर्षांपासून त्यांच्या हातात कोणतीही वस्तू द्या. त्यापासून एक भन्नाट कलाकृती निर्माण होणारच. मग ते लाकूड असो फळभाज्या असो बर्फ असो वा काहीही असो... बरं, हे सर्व तयार करायला त्यांना केवळ पंधरा मिनिटेच लागतात. या वस्तू बनवताना ते एकांत ठिकाणी तयार करत नाही तर सर्वांसमोर तयार करतात. ते कलाकृती तयार करण्याच्या विश्‍वात रमले आहेत. 

बाबूराव यांना चित्रकलेची आवड होतीच. त्यांनी केलेल्या पेंटिंग हॉटेल ताजमध्येदेखील ठेवण्यात आल्या होत्या. दुसरीत असल्यापासून ते पेंटिंग करतात; पण त्यांनतर त्यांना एक वेगळाच छंद लागला. कोणतीही वस्तू बघितली, की त्या वस्तूपासून अद्‌भुत प्रतिकृती तयार होणारच..! बरं या कलेच त्यांनी कोणाकडून प्रशिक्षण घेतलेले नाही. केवळ कोणी काही तयार करत असताना त्या कामाचे निरीक्षण करायचे त्यात स्वत:च्या कल्पना वापराच्या आणि ती प्रतिकृती निर्माण करायची याचा त्यांना छंदच जडत गेला. 
घरच्या आर्थिक परिस्थतीमुळे ते फार शिक्षण घेऊ शकले नाहीत; पण आई-वडिलांनी त्यांच्या कलेला पूर्णपणे पाठिंबा दिला. बाबूराव केवळ आठवीच शिकले. रिक्षा चालवतात; पण त्यांचे कामच एवढे अप्रतिम आहे, की त्यांना कोणत्याही कलेच्या शिक्षणाची कधी गरजच भासली नाही. त्यांनी आजपर्यंत असंख्य वस्तूंपासून विविध प्रतिकृती साकारल्या असतील की त्याची नीटशी संख्याही त्यांना आता सांगता येणार नाही. 
लाकूड, साबण, फळभाज्या, बर्फ, कडधान्ये, कापूस, हरळी, गोणपाटापासून तर त्यांनी अमरनाथ गुहा तयार केली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी अशा तयार करण्यात आलेल्या वस्तू स्वागत कक्षेच्या ठिकाणी शोपीस म्हणून लावल्या जातात. त्या वस्तू बाबूराव सर्वांसमोर तयार करून दाखवतात. गणेशोत्सव-नवरात्रोत्सवात तर आराशीसाठी त्यांनी वांगी, भेंडी, लाल भोपळा, कारले, हरळी, बर्फ यांपासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. या सर्व वस्तू तयार करत असताना ते कोणत्याही साच्याचा उपयोग करत नाही. बर्फापासून वस्तू तयार करताना एक पटाशी व रंगकामासाठी फ्रूट कलर या दोन वस्तूंचाच वापर ते करतात व पंधरा मिनिटात प्रतिकृती तयार. 
फळापासून वस्तू तयार करताना केवळ एक सुरी त्यांना पुरेशी असते. सोशल मीडियाच्या या काळात स्मार्ट बाबूराव स्मार्टफोनपासून कोसो दूर आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे त्यांच्याकडे केवळ जुने छायाचित्रच आढळतील. लिहिता-वाचता येईल एवढेच शिक्षण घेणाऱ्या बाबूराव यांच्याकडे बघितल्यावर त्यांनी स्वत: विकसित केलेली कला आधुनिकच वाटते. 

Web Title: baburao waghmare artist

टॅग्स