त्याच्या हसण्याने डोळे पाणावले!

त्याच्या हसण्याने डोळे पाणावले!

उल्हासनगर - नाल्यात टाकणाऱ्या त्या कचऱ्याच्या काळ्या पिशवीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. काहींनी ती पिशवी बाहेर काढल्यावर त्यात अवघ्या काही तासांचे बाळ असल्याचे कळले. त्याला रुग्णालयात हलवले. नाजूक अवस्थेत बाळाची जगण्याची लढाई आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची २० दिवस धावपळ सुरू होती. या बाळाने त्याला वाचवणाऱ्यांच्या कष्टाचे चीज केले. त्यांच्या कुशीत असतानाच एक ‘स्माईल’ दिली आणि त्याची लढाई अनुभवणाऱ्या साऱ्यांचेच डोळे पाणावले!

३० डिसेंबरला वडोल गावजवळच्या नाल्यात टाकलेल्या पिशवीतून अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ती पिशवी नागरिकांनी बाहेर काढली. त्यात अवघ्या काही तासांचे अर्भक होते. अनेकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या शिवाजी रगडे यांना हे कळल्यानंतर त्यांनी बाळाला सरकारी रुग्णालयात दाखल केले. नऊ दिवस बाळावर उपचार सुरू होते. या रुग्णालयात आवश्‍यक सुविधा नसल्याने शिवाजी रगडे आणि पत्नी जयश्री रगडे यांनीच बाळाला पोलिसांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

‘टायगर अभी  जिंदा है’
बाळाचे नाव काय असावे, यावर जेव्हा विचार झाला त्या वेळी सर्वांनी ‘टायगर’ नावाला पसंती दिली. बाळाला नाल्यात टाकणाऱ्यापर्यंत ‘टायगर जिंदा है’चा संदेश पोहचावा, असे शिवाजी रगडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com