मोठ्याकडून छोट्या भावाला किडनी दान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

मोहाडी - चार वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेले मोहाडी येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आयटीसीचे शिक्षक अनिल डोगमाने (वय 40) यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करीत त्यांची या त्रासातून सुटका केली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल हॉस्पिटल, परेल (मुंबई) येथे झाली. 

मोहाडी येथील अनिल चार वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. चार वर्षांपासून ते नाशिक येथील सुप्रिम व स्वामिनारायण डायलिसिस सेंटरमध्ये दर आठवड्याला डायलिसिस घेत. त्यांचे दोन्ही मूत्रपिंड पूर्णत: निकामी झाल्याने डोगमाने कुटुंब पूर्ण हादरले होते. 

सगळे निराशाग्रस्त असताना अनिल यांच्या आई मूत्रपिंडासाठी पुढे आल्या. आपल्या अवयवापेक्षा मुलगा जगणार या एका आनंदात मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचे निश्‍चित झाल्यावर आईच्या शारीरिक चाचण्या झाल्या. मुलाला जीवदान देण्यासाठी आई आपले मूत्रपिंड देणार हा तिचा त्याग कदाचित नियतीला मान्य नव्हता. म्हणूनच की काय आईचे आठ महिन्यांपूर्वीच अचानक निधन झाले. त्यामुळे डोगमाने अधिकच चिंताग्रस्त झाले. 

त्यातच अनिल यांचे मोठे भाऊ व श्री समर्थ पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डोगमाने यांनी भावासाठी स्वत:चे मूत्रपिंड देण्याचे धाडस दाखवून प्रकाश डोगमाने यांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या व पंधरा दिवसांपूर्वी अनिल डोगमाने यांची डॉ. जितेंद्र जगताप, डॉ. भरत शाह व डॉ. प्रशांत राजपूत यांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करीत त्यांची या त्रासातून मुक्तता केली. ग्लोबल रुग्णालयातर्फे प्रकाश डोगमाने यांचा डॉक्‍टरांच्या पथकाने सत्कार केला. 

बंधुप्रेमाचे सर्वत्र कौतुक 
समाजामध्ये एकीकडे संपत्तीसाठी भावाभावांमध्ये वाद होऊन ते विकोपाला जातात, पण प्रकाश डोगमाने यांनी भावासाठी मूत्रपिंड देण्याच्या धाडसाबद्दल गाव व पंचक्रोशतील ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: big brother donated kidney

टॅग्स