अवयवदानामुळे ५ रुग्णांना जीवनदान

Body-Part-Donate
Body-Part-Donate

पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ब्रेन डेड झालेल्या २७ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अवयवदान व प्रत्यारोपणाबाबत पाटील म्हणाल्या, ‘‘डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातर्फे अवयवदानाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याला रुग्णाच्या नातेवाइकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ४० जणांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

एक ऑक्‍टोबरला २७ वर्षीय महिला ब्रेन डेड झाली होती. तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधून अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. त्यानुसार यकृत, दोन मूत्रपिंड व दोन नेत्रपटल दान करण्यात आले. त्यामुळे पाच रुग्णांना जीवदान मिळाले. मात्र, संबंधित महिलेचे हृदय प्रत्यारोपण करण्यायोग्य नव्हते.’’

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर म्हणाले, ‘‘अवयवांची गरज असणारे रुग्ण व अवयवदाते यांच्या संख्येत खूप तफावत आहे. त्यामुळे अवयवदानाबाबत जागृती करणे गरजेचे आहे. अवयव प्रत्यारोपणामध्ये डॉ. बिपिन विभूते व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.’’ 

अवयदानाबाबत कार्य करणारे डॉ. पी. एस. गर्चा, डॉ. वत्सला स्वामी, डॉ. वैशाली भारंबे, डॉ. माजीद सिंग आदी उपस्थित होते.

अवयवदान सर्वश्रेष्ठ दान
मला किडनी मिळाल्यामुळे जीवदान मिळाले आहे. किडनी दिलेला रुग्ण, त्यांचे नातेवाईक व डॉक्‍टरांचा मी ऋणी आहे. अवयवदान हे सर्वांत मोठे दान आहे, अशा शब्दांत किडनी रोपण झालेल्या रुग्णाने कृतज्ञता व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com